पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Ncp Sharad Pawar ) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर हल्ला ( Silver Oak Attack ) करण्यात आला होता. त्याप्रकरणी आता पुण्यातून एका पत्रकाराला अटक करण्यात आली असून, त्यास मुंबईत आणण्यात येत ( Mumbai Police Arrested Journalist In Pune ) आहे. हल्ला प्रकरणात आजतागायत 115 जणांना अटक करण्यात आली आहे.
या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातूनही ही अटक झाल्याचे बोलले जात आहे. मुंबई येथील गावदेवी पोलिसांनी ही अटक केली आहे. चंद्रकांत सुर्यवंशी असे या पत्रकाराचे नाव आहे. तो भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव पठार या ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त निलोप्तल यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुर्यवंशीचे MJT नावाचे यू ट्यूब चॅनल आहे. शरद पवरांच्या सिल्वर ओक या निवासस्थाची रेकी केल्याचा सूर्यवंशीवर संशय आहे.