महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अजित पवार कमी पडतायत म्हणून शरद पवार मैदानात : चंद्रकांत पाटील - etv bharat live

'पुणे-पिंपरीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षात जनतेच्या हिताची मोठी कामे आम्ही केली आहेत. भाजपाला रोखणे अजित पवार यांना शक्य होत नसल्याने पवार यांना मदतीला बोलविण्यात येत असावे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

chandrakant patil
chandrakant patil

By

Published : Oct 25, 2021, 7:52 PM IST

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्र अजित पवार यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार लक्ष घालत असताना ते बहुधा कमी पडत आहेत म्हणून पवार साहेबांना लक्ष घालावं लागत आहे, अशी खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अजित पवार कमी पडतायत म्हणून शरद पवार मैदानात
पुणे, पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकांसाठी शरद पवार मैदानातराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: महापालिकेसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पदाधिकारी मेळावा घेतला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिकेसाठी दिवाळीनंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.भाजपाला रोखणे अजित पवार यांना शक्य होत नसावेपाटील म्हणाले, ''पुणे-पिंपरीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षात जनतेच्या हिताची मोठी कामे आम्ही केली आहेत. भाजपाला रोखणे अजित पवार यांना शक्य होत नसल्याने पवार यांना मदतीला बोलविण्यात येत असावे.'' पुणे-पिंपरीतील सत्ता राखण्यासाठी भाजपानेदेखील तयारी केली असून साडेचार वर्षातील कामावर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.हेही वाचा -समीर वानखेडे यांच्याकडून मला अन् कुटुंबियांना धोका, प्रभाकर साईलने संरक्षणासाठी केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details