महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2022, 4:44 PM IST

ETV Bharat / city

Balgandharva : बालगंधर्वांच्या गायकीत ईश्वरी अंश - डॉ. शंकर अभ्यंकर

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे बालगंधर्वांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार ( Balgandharva Gun Gaurav Award ) यावर्षी ठाण्याचे पं. मुकुंद मराठे यांना विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर ( Dr. Shankar Abhyankar ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी अभ्यंकर बोलत होते. ५१ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Balgandharva
बालगंधर्वांच्या गायकीत ईश्वरी अंश

पुणे - भास्करबुवा बखले यांचे बालगंधर्व ( Balgandharva ) आणि कृष्णराज फुलंब्रीकर हे दोन शिष्य. दोघे गायक शिष्य हे पट्टीचे गायक. दोघांच्या गळ्याची जात वेगळी त्यानुसार बखलेबुवा त्यांना गाणे शिकवत. बखले गुरुजीच्या मार्गदर्शनात गायनाची तालीम सुरुच होती आणि कालांतराने बालगंधर्वांनी गायकीच्या क्षेत्रात अद्भभूत कार करुन ठेवले. बालगंधर्वांच्या गायकीत ईश्वरी अंश होता असे म्हटल्यास अतीशोयक्ती होणार नाही असे गौरवोद्गार डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काढले.

बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार वितरण - बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे बालगंधर्वांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार ( Balgandharva Gun Gaurav Award ) यावर्षी ठाण्याचे पं. मुकुंद मराठे याना विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी अभ्यंकर बोलत होते. ५१ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

आणि बालगंधर्वांनी इतिहास घडविला- डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले, बालगंधर्वांची गायकी म्हणजे महाराष्ट्रातील नाट्यसृष्ट्रतील चिरकाल आणि शाश्वत असे सुवर्णपान आहे. लहान मुलांच्या कानातील डुल जसे सहजतेने डुलतात आणि ते कोणत्याही अंगाने पाहिले तरी सुंदरच दिसतात, तशी बालगंधर्वांची गायकी कोणत्याही अंगाने पाहिली तरी सहज आणि सुंदर दिसायची. बालगंधर्वांनी सदैव सुरांवर प्रेम केले. प्रारंभी बालगंधर्वांना नाटकांत काम करायचेच नव्हते. त्यात स्त्री भूमिका तर नाहीच करायची होती. पंरतू देवल यांनी त्यांना पटवून सांगितले की प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषांत एक स्त्री असते म्हणुनच आपण अर्धनारी नटेश्र्वराची पूजा मांडत असतो. बालगंधर्वांना हे पटले आणि त्यांनी इतिहास घडविला.

शेवटी नाट्यसंगीताची मैफल संपन्न - पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगबहार या नाट्यसंगीताची मैफल संपन्न झाली. या मैफलीत राजा काळे, पं. उपेंद्र भट, बकुल पंडित, मुकुंद मराठे, अभिनेत्री गात, अभिषेक काळे, गायत्री कुलकर्णी, रविंद्र कुलकर्णी, प्राजक्ता काकतकर व सुरेश साखवळकर हे कलाकार सह‌भागी झाले होते. त्यांना तबला साथ अभिजित जायदे व केदार कुलकर्णी, आँर्गन साथ संजय गोगटे व बाळ दाते तर व्हायोलीनची साथ प्रज्ञा देसाई- शेवडे यांनी केली.

हेही वाचा -Strike in Solapur : जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी; सोलापुरात भुसार व्यापाऱ्यांचा बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details