पुणे - कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता, या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीला होते. हा रोग संपर्कामुळे पसरत आहे. यामुळे पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड आज पासून बंद करण्यात आला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा आजपासून पर्यटकासाठी बंद, कोरोना विषाणुंचे संक्रमनाच्या पाश्वभूमीवर निर्णय - News about the Corona virus
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज पासून शनिवार वाडा बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबद्दल आदेश काढला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा आजपासून पर्यटकासाठी बंद, कोरोना विषाणुंचे संक्रमनाच्या पाश्वभूमीवर निर्णय
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना म्हमून शनिवार वाडा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आदेशानुसार आज पासून पुढील आदेश येई पर्यंत शनिवार वाडा बंद करण्यात येत आहे, अशी माहिती सुरक्षारक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.