महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shahir Hemant Raje Mawle : वाईन निर्णयाच्या निषेधार्थ शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत - शाहीर हेमंतराजे मावळे

महाराष्ट्रात किराणा ( Wine in Maharashtra ) दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ शाहीर हेमंतराजे मावळे यांनी ( Shahir Hemant Raje Mawle returned award ) आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्य सरकारचा पुरस्कार परत केला. 2017 मध्ये त्यांना व्यसनमुक्तीबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला होता.

शाहीर हेमंतराजे मावळे
Shahir Hemant Raje Mawle

By

Published : Jan 30, 2022, 1:34 PM IST

पुणे -राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना 2017 साली व्यसनमुक्तीबाबत शासनाचा महात्मा गांधी यांच्या नावाने मिळालेलं पुरस्कार परत केला आहे.

शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत
म्हणून पुरस्कार केला परत -नुकतंच राज्य शासनाने वाईन सुपरमार्केटमध्येही विकता येणार आहे असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्याच्या विरोधात राज्य सरकारवर विरोधी पक्षाच्यावतीने जोरदार टिका करण्यात आली. आता या निर्णयाच्या निषेधार्थ शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांना व्यसनमुक्तीबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने परत केला आहे.आणि आज पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या इथं हा पुरस्कार ठेवण्यात येईल आणि उद्या तो जिल्हाधिकारी यांना परत करण्यात येणार आहे, असे यावेळी मावळे म्हणाले.शासनाचा निर्णय चुकीचा -


वाईन आत्ता सर्वसामान्य दुकानात मिळणार आहे. वाईन ही दारू आहे का नाही त्यात काहीही अर्थ नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. वाईन पिणं हे देखील चुकीचं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून लहान मुलांवर आम्ही शाहिरीच्या माध्यमातून संस्कार करत आलो आहे. आत्ता सरकारचं दुकानांमध्ये वाईन आणत असेल ते निषेधार्थ आहे. शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत नेहेमीच प्रबोधन करत आलो आहे. याबाबत हा राज्यशासनाचा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. पण सरकारच्या या निर्णयामुळे ज्या मुलांवर संस्कार करणार आहोत. तेच मुलं उद्या जाऊन दुकानांमधून वाईन घेतील. हे चुकीचं असल्याने याच्या निषेधार्थ हा पुरस्कार मी शासनाला परत करत असल्याचं मत यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केलं. सरकारने जो निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा असून याबाबत पून्हा विचार करून हा वाईन बाबतचा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी मावळे यांनी केली.

हेही वाचा -Income Tax Red: निवडणुकीच्या धामधुमीत आयकर विभागाने हवाला मार्फत आलेले 6 कोटी केले जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details