पिंपरी-चिंचवड- लग्नाचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तसेच महिलेकडून बिटकोईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पैसेही घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेवर लैंगिक अत्याचार करत 11 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल - Sexual assault on a woman
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तसेच महिलेकडून बिटकोईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पैसेही घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोनित डी. कपूर ऊर्फ संदीप दादाराव वायभिसे (वय 34, रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वायभिसे याने फिर्यादी महिलेकडून बीटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेतले. तसेच सिंगापूर येथे नोकरीकरिता आणि नर्सिंग कोर्सकरिता वेळोवेळी पैसे घेतले. फिर्यादी महिलेचे क्रेडिट आणि डेबीट कार्ड वापरून अनेक गोष्टींची खरेदी करीत तब्बल 11 लाखांची फसवणूक केली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.