पुणे -पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालविणार्या दोन एजेंटना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -जावेद अख्तर आणि गुलझार यांचे मराठी साहित्यात योगदान काय? - दवे
महिंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय 34) आणि पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय 46) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बिबेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट ग्राहक पाठवून केली खातरजमा
बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस या उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला.
दोन एजेंटना अटक
दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून दोन एजेंटना अटक करण्यात आली आहे. कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल, कंडोमची पाकिटे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पीडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा -ST Workers Strike :...तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार !