महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी पुण्यात पडली पार

या लसीच्या दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशातील काही शहरांमध्ये होणार आहे. त्यासाठी देशभरातील शंभर स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. ही लस दिल्यानंतर तिचे काय परिणाम दिसून येतात याचा अभ्यास केला जाणार आहे. साधारणपणे आठवडाभरात हा अहवाल प्राप्त होईल. पहिल्या टप्प्यातील चाचणीनंतर देशभरात आणखी पंधराशे जणांना ही लस दिली जाणार आहे.

Corona Vaccine Test
कोरोना प्रतिबंधक लस चाचणी

By

Published : Aug 26, 2020, 2:09 PM IST

Updated : Aug 26, 2020, 5:40 PM IST

पुणे- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अ‌ॅस्ट्राझेनेको आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहभागातून कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यात आली आहे. या लसीची पहिली मानवी चाचणी आज(बुधवारी) पुण्यात पार पडली. पुण्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये एका स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली.

कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी

या लसीची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशातील इतर काही शहरांमध्ये होणार आहे. त्यासाठी देशभरातील शंभर स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. ही लस दिल्यानंतर तिचे काय परिणाम दिसून येतात, याचा अभ्यास केला जाणार आहे. साधारणपणे आठवडाभरात हा अहवाल प्राप्त होईल. पहिल्या टप्प्यातील चाचणीनंतर देशभरात आणखी पंधराशे जणांना ही लस दिली जाणार आहे.

पुण्यातील भारती हॉस्पिटलसह ससून रुग्णालय, मुंबईतील केईएम आणि जहांगिर हॉस्पिटलमध्येही पुढील काळात चाचण्या होणार आहेत. चाचणी घेण्यात येत असलेल्या लसीचे 'कोविशील्ड' असे नामकरण करण्यात आले आहे. लवकरात लवकर या चाचण्या पूर्ण करून कोरोना आजारावर एक परिणामकारक लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Aug 26, 2020, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details