महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ज्येष्ठ समाजवादी नेत्या पुष्पा मायदेव यांचे निधन - Senior socialist leader Pushpa Maydev

ज्येष्ठ समाजवादी नेत्या पुष्पा मायदेव यांचे आज दुपारी वृद्धपकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी 7.30 वा. पुण्यातील नवी पेठ वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुष्पा मायदेव यांचे निधन
पुष्पा मायदेव यांचे निधन

By

Published : Jan 18, 2022, 7:28 PM IST

पुणे - ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि समाजवादी महिला सभेच्या अध्यक्षा पुष्पा मायदेव यांचे आज दुपारी वृद्धपकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी 7.30 वा. पुण्यातील नवी पेठ वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या त्या मातोश्री व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या त्या सासू होत्या.

पुष्पा मायदेव यांना सामाजिक कार्य व राजकारणाचा वारसा त्यांच्या सासूंकडून मिळाला. त्यांच्या सासू इंदिरा अनंत मायदेव या महात्मा गांधीच्या अनुयायी होत्या. गांधीच्या सर्व चळवळीत त्या सक्रिय असत.

ABOUT THE AUTHOR

...view details