पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ( Muslim Satyashodhak Mandal ) कार्यकर्ते सय्यद भाई यांचं निधन झालं ( Padmashri Sayyad Bhai Passed Away ) आहे. वयाच्या 87 व्या वर्षी दुपारी अडीचच्या सुमारास सय्यद भाई यांनी पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Padmashri Sayyad Bhai Passed Away : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री सय्यद भाई यांचं निधन - Muslim Satyashodhak Mandal
पद्मश्री पुरस्काराने गौरविलेले पुण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई यांचं निधन झालं ( Padmashri Sayyad Bhai Passed Away ) आहे. पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
![Padmashri Sayyad Bhai Passed Away : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री सय्यद भाई यांचं निधन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री सय्यद भाई यांचं निधन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14965337-298-14965337-1649419742268.jpg)
तलाक पीडित मुस्लिम महिलांसाठी लढा : 6 एप्रिल 1936 साली सय्यद भाई यांचा गुलबर्गा येथे जन्म झाला. आयुष्यभर मुस्लिम महिलांच्या प्रश्नांसाठी सय्यदभाई लढत होते. हमीद दलवाई यांनी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक महामंडळाचे सुरवातीला कार्यकर्ता मग अध्यक्ष म्हणून सय्यदभाई यांनी काही काळ कार्यभार स्वीकारला. तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देत असतानाच त्यांच्या पुनर्वसनासाठी अविरत कार्यरत राहणाऱ्या हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाची धुरा त्यांच्या पश्चात सय्यदभाई यांनी निरंतरपणे सांभाळली आहे. तिहेरी तलाक पद्धत बंद होण्यासाठी दीर्घ काळ लढा देणाऱ्या सय्यदभाई यांच्या कार्याची, योगदानाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. तर शासनाकडून 2020 साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. नुकतंच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सय्यदभाई यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला होता.