पुणे - ज्येष्ठ विधीज्ञ आणि बॉलीवूडमधील कलावंताचे वकील म्हणून प्रसिद्ध असणारे अॅड. श्रीकांत शिवदे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यात निधन ( Senior lawyer Shrikant Shivade Passes Away ) झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. आज सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले असा परिवार आहे. वकिलांमध्ये उत्तम स्रेही, अत्यंत अभ्यासु मनमिळावू आणि मैत्रीला जागणारा म्हणून ते वकिलवर्गात लोकप्रिय होते. प्रदीर्घ काळ जीवघेण्या आजाराशी झुंजत असतानाही त्यांनी उच्च न्यायालयात व्हीसीद्वारे युक्तीवाद केला होता. श्रीकांत शिवदे ( Adv Shrikant Shivade ) हे फौजदारी कामकाजात एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. साक्षीदाराची उलट तपासणी घेणारे प्रख्यात वकील म्हणून ते ओळखले जात.
बॉलीवूडमधील कलावंताचे वकील जेष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे निधन - Shrikant Shivade death
ज्येष्ठ विधीज्ञ आणि बॉलीवूडमधील कलावंताचे वकील म्हणून प्रसिद्ध असणारे अॅड. श्रीकांत शिवदे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यात निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. आज सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली वकिली सुरु केली होती. खासदार वंदना चव्हाण, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विराज काकडे यांच्यासमवेत यांनी एकत्रित काम केले. मोहिते चेंबरचे वकील
म्हणून ते ओळखले जात. श्रीकांत शिवदे यांनी कायम फौजदारी केसेस चालविल्या. सलमान खान याच्या बांद्रा येथील हिट अँड रन खटल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. या खटल्यात अॅड. शिवदे यांनी पुण्यातील केपीआयटी टेक्नॉलॉजी तसेच यातील लँड क्लुझर कंपनीचा गाडीविषयाचा पुरावा सादर करुन सलमान खानची बाजू भक्कम केली होती. प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि बॉलीवूडमधील चित्रपटांचे फायनान्सर भरत शहा यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला मदत केल्याच्या खटल्यात शहा यांचे काम अॅड. शिवदे यांनी पाहिले होते. भारतातील हा पहिला खटला होता, ज्यात पुरावा म्हणून कॉल रेकॉर्ड सादर करण्यात आले होते.
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावरील बलात्काराच्या खटल्यात त्यांनी काम पाहिले होते. मालेगाव बॉम्बब्लास्टमधील लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते. सलमान खान याच्या बांद्रा येथील हिट अँड रन खटल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. या खटल्यात अॅड. शिवदे यांनी पुण्यातील केपीआयटी टेक्नॉलॉजी तसेच यातील लँड क्लुझर कंपनीचा गाडीविषयाचा पुरावा सादर करुन सलमान खानची बाजू भक्कम केली होती.