महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महिला अंघोळ करताना सुरक्षारक्षक काढत होता व्हिडिओ; अन् तेवढ्यात... - बंडगार्डन पोलीस स्टेशन

पुणे स्टेशनजवळील (Pune Railway Station) शासकीय निवासस्थान येथे महिला अंघोळ करत होती. तेवढ्यात बाथरूममधील खिडकीच्या बाजूला आरोपी सुरक्षारक्षक अशोक चव्हाण उभा होता. आरोपीने त्या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केल्याने हा प्रकार समोर आला आहे.

Bund Garden Police Station
बंडगार्डन पोलीस स्टेशन

By

Published : Nov 24, 2021, 5:43 PM IST

Updated : Nov 24, 2021, 7:25 PM IST

पुणे - पुणे स्टेशनजवळील (Pune Railway Station Area) शासकीय निवासस्थान येथे एक महिला अंघोळ करत असताना त्या महिलेचे सुरक्षारक्षकाने फोटो आणि व्हिडिओ काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी सुरक्षारक्षकास अटक (Security guard arrested) करण्यात आली आहे. अशोक तुकाराम चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी
  • आरोपी सुरक्षारक्षक अटकेत -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय निवासस्थानामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास 26 वर्षीय महिला अंघोळ करत होती. तेवढ्यात बाथरूममधील खिडकीच्या बाजूला आरोपी अशोक चव्हाण उभा होता. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. तेवढ्यात महिलेला काही हालचाल जाणवली. तिला खिडकीजवळ एक व्यक्ती दिसून येताच, तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

  • सीसीटीव्हीच्या आधारे शोध -

आरडाओरड ऐकून नागरिक महिलेच्या मदतीला आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सीसीटीव्हीच्या आधारे सुरक्षारक्षक त्यावेळी सदर ठिकाणी उपस्थिती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित महिलेने तक्रार दिली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीकडे चौकशी सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांकडून सांगण्यात आले.

Last Updated : Nov 24, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details