पुणे:तांबडी जोगेश्वरी ही शहराची ग्रामदेवता आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन करण्यात येते. दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. सुरवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या आवारातच गणेशमुर्तीची स्थापना केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते.
या बाप्पाची मूर्ती पाहिली तर आफ्रिकन हत्तीचा चेहरा असणारी हि एकमेव मूर्ती आहे. ३३ इंच उंच आणि २६ इंच रुंद अशी हि मूर्ती आहे. या मूर्तीची आगमनाची मिरवणूक रथातून तर विसर्जनाची मिरवणूक पालखीतून काढण्यात येते, गेल्या चार पिढ्यांपासून दत्तात्रय कुलुंजकर यांचे कुटुंब गणेशाची मूर्ती साकारत होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हि मूर्ती गिरे कुटुंब बनवत आहे. या ठिकाणची मूर्ती हे तीन महिने अगोदर बनवायला सुरुवात होते ब्रह्म मुहूर्ता वरती चतुर्थीला ही मूर्ती बनवायला सुरुवात करतात कारण ही मूर्ती तेथे सिंचन असते आणि त्याचबरोबर ही मूर्ती वेळ लागतो कारण ही मूर्ती संपूर्णपणे शाडू मातीची असते आणि ही मूर्ती जी आहे ती पूर्ण हातानेच बनवलेली असते त्याचबरोबर या गणपतीची मिरवणूक आहे ती खांद्यावर रथावरच होते त्यामुळे त्याची मूर्तीची उंची ही कमीच ठेवावी लागते.