पुणे - पुण्यात आजपासून राज्यात २४ जानेवारी पासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची वाढ पाहता स्थानिक प्रशासनाने शाळा बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर आज 1 फेब्रुवारीपासून पुण्यात पुन्हा पहिली ते दहावी सुरू ( Schools Reopen In Pune ) होत आहेत.
शाळेत विद्यार्थांचे स्वागत -
पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 4 तास सुरू करण्यात आल्या आहेत. तर नववीच्या पुढील शाळा आहे त्याच वेळेत सुरू राहणार आहेत. गेल्या 2 वर्षानंतर शाळेत दुसऱ्यांदा शाळेत येताना या चिमुकल्यांच्या चेहेऱ्यावर वेगळंच आंनद पाहायला मिळाला. आता शाळा सुरू झाल्याअसून शाळा बंद होऊ नये असे यावेळी या विद्यार्थ्यांनी सांगितले. राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग शाळेत आज मुलांना गुलाबपुष्प, मास्क आणि सॅनिटायझेशन देऊन नगरसेवक आबा बागुल यांनी स्वागत केलं आहे.
शाळेकडून सर्व नियमांचे पालन -
पुण्यात आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळेच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या नियमावलीच पालन करून शाळा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मामिटरने चेकिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझेशन याचा वापर करूनच विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले. वर्गात देखील सुरक्षेच्या अंतराची योग्य काळजी घेतल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्या पालकांनी शाळेला हमीपत्र दिल आहे. अश्याच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हमीपत्र दिलेलं नाही अश्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणार आहे. अशी माहिती राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग शाळेच्या आबा बागुल यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे अजूनही 40 टक्के पालकांनी हमी पत्र दिलेलं नाही.