महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद

पुणे शहरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सांगितले आहे.

Mayor Muralidhar Mohol
महापौर मुरलीधर मोहोळ

By

Published : Feb 28, 2021, 4:18 PM IST

पुणे - पुणे शहरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. याआधी 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे आता शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद असणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ
पूढे परिस्थिती पाहून निर्णय घेऊ - महापौर
पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन देखील यापुर्वी प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे. 14 मार्च नंतर शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू होणार की नाही याबाबतचा निर्णय नंतर त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या तरी मनपाच्या हद्दीतील सर्वच शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.
रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी कायम-
पुणे शहरात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जी संचारबंदी लावण्यात आली होती ती कायम ठेवण्यात आली असून अत्यावश्यक सेवा तसेच शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांनाच यात मुभा देण्यात येणार आहे.रात्री अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही पूणे पोलिसांना करण्यात आली आहे, असे यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details