पुणे- राज्यात सोमवार दिनांक 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, पुणे शहरात शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोना बाधितांचा आकडा सध्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्यची माहिती पुणे महानगर पालिकेची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केला.
राज्य सरकारने 23 नोव्हेंबर पासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. त्यानुसार पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत 13 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी जाहीर केले आहे.