महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Rape Case : धक्कादायक, पुण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बस चालकाने केला बलात्कार - Pune Rape Case

पुण्यातील वडाची वाडी परिसरात राहणार्‍या 15 वर्षीय मुलीवर बस चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली ( Pune Rape Case ) आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली ( bus driver arrested for raping 15 year old girl in pune ) आहे.

kondhawa police
kondhawa police

By

Published : Jul 18, 2022, 4:48 PM IST

पुणे - पुण्यातील वडाची वाडी परिसरात राहणार्‍या 15 वर्षीय मुलीवर बस चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली ( Pune Rape Case ) आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील ( वय, 35 रा.वडाची वाडी ) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली ( bus driver arrested for raping 15 year old girl in pune ) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमेश्वर घुले पाटील याची स्कूल बस आहे. आरोपीच्या बस मधून ती पीडित मुलगी शाळेसाठी जात असायची. त्यामुळे आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. त्या ओळखीमधून आरोपीने पीडित मुलीस म्हणाला की, आपण रिलेशनशीपमध्ये राहूयात. नेमकं रिलेशनशीप काय प्रकार असतो. हे पीडित मुलीस माहिती नव्हते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी सोमेश्वर घुले पाटील याने तिच्यावर मार्च आणि जून दरम्यान अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला.

त्या बाबत पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा -Washim Hijab Controversy : हिजाब व बुरखा घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारला; सपाचे आमदार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details