पुणे -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ( Maharashtra State Examination Council ) २०१९-२०मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ( Scam in Teacher Eligibility Test )अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न ( Scam in TET Exam 2019 ) झाले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी देखील सुरू आहे.
पेपरफुटीमध्ये 40 आरोपींना अटक -
टीईटीच्या 2019 ची परीक्षा जी 2020 मध्ये झाली होती. त्याबाबत तपास केला असता पुणे पोलिसांना जवळपास 7800 लोकांचा नाव समोर आला आहे. ज्यांनी चुकीचे सर्टिफिकेट काढून पास झाले आहे. ती यादी पुणे पोलीस शासनाकडे देणार आहे. पेपरफुटी प्रकरणात जवळपास 40 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास देखील पोलीस करत आहे. असं देखील यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले.
त्या उमेदवारांवर कारवाई -
याबाबत राज्य परीक्षा परिषदीचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांना विचारले असता ते म्हणाले की, जे 7800 परीक्षार्थी सायबर पोलिसांनी शोधून काढलेत. ते आता सेवेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांच्यावर कारवाई ही विभागाच्या मार्फत होणार आहे. परिषदेचे किंवा कोणत्याही विभागाचे कोणीही त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावर ही कारवाई होईल. फेब्रुवारी 2013 पासून ते 2020-21 पर्यंत नियुक्त असलेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र विभागाने मागवले आहेत. त्यानुसार आतापर्यंत केवळ 6 हजार 86 प्रमाणपत्र आमच्याकडे आलेले आहे. त्यातही जर बोगस असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होईल. जोपर्यंत 7 हजार 800 अपात्र परिक्षार्थींची नावे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत अपात्र उमेदवार सेवेत आहेत की नाही हे सांगता येणार नाही. पण ती यादी आल्यानंतर या सर्व उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल असे यावेळी जगताप म्हणाले.