महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे सोमवारी काम बंद आंदोलन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाl कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालयाचे कामकाज आज ठप्प झाले आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीही आज काम बंद आंदोलन केले आहे.

Pune University employees strike
Pune University employees strike

By

Published : Nov 22, 2021, 5:25 PM IST

Updated : Nov 22, 2021, 5:33 PM IST

पुणे - मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदने, भेटी आणि बैठका होऊन सुध्दा शासनाच्या उदासीनतेमुळे हे प्रश्न सुटलेले नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीने आयोजित केलेल्या आव्हानानुसार १६ नोव्हेंबर, २०२१ पासून शासनाचा निषेध करण्याकरिता काळ्या फिती लावून आंदोलन चालू केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात आला आहे. यामुळे महाविद्यालयाचे कामकाज आज ठप्प झाले आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीही आज काम बंद आंदोलन केले आहे.

पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
..या आहेत मागण्या -
राज्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची 58 महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी यासह अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
Last Updated : Nov 22, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details