पुणे - देशात मुलींची पहिली शाळा कोणी ( Who Start First Girl School In India ) सुरू केली? असा प्रश्न विचारला, तर आपल्या डोळ्यापुढे महात्मा फुले ( Mahatma Jyotiba Phule ) यांचे नाव येतं. पण कुठे सुरू केली, असं विचारलं तर कुठल्या तरी, वाड्यात सुरू ( Pune Bhide Wada ) केली होती, असं उत्तर ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन त्यांनी ती कोणत्या वर्षी असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता येत नाही. १ जानेवारी १८४८ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या ( First Girl School Start In Bhide Wada ) वाड्यात सुरू केली होती. मात्र, स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची बीजे पेरणाऱ्या आणि फुले दांपत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज 172 वर्षांनंतरची ( Bhide Wada Condition ) अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. यासंदर्भात सावित्रीबाईंच्या वंशज नीता होले फुले ( Savitribai Fule Descendants ) यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचीत केली आहे.
'...म्हणून या वाड्याची अशी स्थिती' -
सावित्रीबाई आपल्या देशात जन्माला आल्या त्याचा मला प्रचंड आनंद होतो. मात्र, ज्या शाळेतून स्त्री शिक्षणाची बीजं रोवल्या गेली, त्या जागेची अशी दयनीय अवस्था बघून दुखंही होतं. सावित्रीबाईंनी ज्या जिद्दीने महिलांना शिक्षण दिले, त्यासाठी जो संघर्ष त्यांनी केला, तसा संघर्ष करण्यात आम्ही अयशस्वी झालो. त्यामुळे या वाड्याची अशी स्थिती आहे. याची आम्हाला खंत देखील वाटते, अशी प्रतिक्रिया सावित्रीबाईंच्या वंशज नीता होले फुले यांनी दिली आहे.
भिडे वाड्याची सद्यस्थिती अत्यंत दयनीय -