पुणे -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या २२ एप्रिल पासून पुणे दौऱ्यावर येत ( Sarsanghchalak Mohan Bhagwat Pune Tour ) आहेत. २३ अणि २४ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघटनात्मक कामाच्या विविध बैठकांमध्ये त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी माहिती दिली आहे.
Mohan Bhagwat Pune Tour : सरसंघचालक दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर; विविध बैठकांचे आयोजन - Sarsanghchalak Mohan Bhagwat marathi news
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या २२ एप्रिल पासून पुणे दौऱ्यावर येत ( Sarsanghchalak Mohan Bhagwat Pune Tour ) आहेत. याबाबत संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी माहिती दिली आहे.

Mohan Bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी बैठक २३ आणि २४ एप्रिलला पुण्यात फुलगाव येथे होणार आहे. तसेच, हडपसर येथील डॉ. दादा गुजर माता-बाल रुग्णालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिरासमोर माळवाडी, हडपसर येथे पार पडेल, अशी माहितीही दबडघाव यांनी दिली आहे.