पुणे -रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या मंचर शहरातील खासगी रुग्णालयाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केली आहे. त्याविरोधात त्यांनी २५ डिसेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आसून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारीऱ्यांनी सरपंच गांजाळे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या मंचर शहरातील खासगी हॉस्पिटल विरुद्ध सरपंचच बसले उपोषणाला हेही वाचा -कांदा लसूण संशोधन केंद्रात प्लास्टिक बंदीची घेतली शपथ
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक मिलिंद कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अभय तिडके यांनी उपोषण स्थळी येऊन सरपंच गांजाळे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नसल्याने सरपंच गांजाळे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
हेही वाचा -बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली
सध्या वातावरणातील बदलामुळे विविध रोगराई पसरली जाते, याचाच फायदा घेत डेंग्यूच्या नावाखाली मंचर शहरात रुग्णांची लूटमार सुरू असून काही नवीन डॉक्टर बेसुमार बिल वसूल करत असल्याचा आरोप सरपंच दत्ता गांजाळे यांनी केला आहे. अशा खासगी रुग्णालयांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करत गांजाळे यांनी सलग दुसऱ्या दिवशीही आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.