पुणे -माध्यमांकडून प्रसिद्धी मिळवण्यासाठी सराईत गुन्हेगार (Sarait criminals ) आपण कसे मोठे आहोत हे दाखवता आहेत. सिद्धू मूसेवाला हत्तेची ( Sidhu Moose murder case ) जबाबदारी आतापर्यंत पाच गॅंगस्टरने स्वीकारली आहे. त्यातले चौघे देशाबाहेर आहेत. प्रत्येकजन आपण कसे मोठे आहोत हे दाखवत आहे. पंजाब पोलिसांनी देखील तेच सांगितले आहे. त्यामुळे संतोष जाधव, सौरव महाकाल भुरटे गुन्हेगार ( Santosh Jadhav, Sourav Mahakal criminals) आहेत. ते फक्त या टोळीतील काही लोकांच्या संपर्कात होते. त्याचा फायदा त्यांनी घेतला आहे. स्वतःचा रेट वाढविण्यासाठी दोघेही खोटी माहिती देत आहे असे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ( Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh ) यांनी सांगितले.
अतिशय किरकोळ पैशांसाठी गुन्हे -आत्तापर्यंत आरोपी अटक केलेल्या आरोपीनी किरकोळ पैशासाठी या गोष्टी केल्या आहेत. किरकोळ गुन्हा केलेल्या लोकांना शेलटर देणे, त्यांना सहारा देणे, त्यांना काही दिवस लपवून ठेवणे. अशा प्रकारची मदत यांनी केल्यानंतर त्यांच्याकडून मोठे गुन्हे करून घेण्यासाठी त्यांना वापरले जात आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंट वर फोटो टाकून त्यांना अधिकाधिक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे. बिष्णोई गँगचा यांचा वापर मोठी खंडणी ( recovered ransom ) मागण्यासाठी करत आहे. असे, देखील देशमुख यांनी म्हटले आहे.
पोलिसांचे तरुणांना आवाहन -बिष्णोई गँग ज्या पद्धतीने सोशल मीडियावर स्वतः च वास्तव्य दाखवते, तसे प्रत्येक्षात काहीच नाही. हे वास्तव पाहिल्यावर कोणतंही व्यक्ती त्यांच्या या सोशल मीडियाच्या अमिषाला बळी पडणार नाही. तरुणांनी कोणत्याही अमिशाला बळी पडू नये असे आवाहन देशमुख यांनी केले.