महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न - tukaram maharaj palkhi

ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा आज (शुक्रवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण आळंदी नगरी ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमून निघते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी परिसरात शुकशुकाट दिसून येत होता.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न.

By

Published : Jul 2, 2021, 8:57 PM IST

आळंदी/पुणे -ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा आज (शुक्रवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण आळंदी नगरी ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमून निघते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. परंतु पालखी प्रस्थान सोहळ्यात अगदी मोजके वारकरी जरी असले तरी उत्साह मात्र कमी झालेला पाहायला मिळाला नाही.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आज दुपारी (शुक्रवारी) 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरापासून पालखी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी पहाटे घंटानाद, काकडा, पावमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती समाधी मंदिरात करण्यात आली व त्यानंतर विना मंडपात भजन, कीर्तनाने प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. माऊलींच्या मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे ट्रस्टी आणि प्रशासनाकडून उत्तम प्रकारे काळजी घेतली जात होती.

19 जुलै रोजी एसटीने पादुका पंढरपूरकडे होणार रवाना

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराबाहेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून त्याठिकाणी वारकरी, ट्रस्टी यांच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि नर्सही तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रस्थान सोहळ्यानंतर माऊलींच्या पादुका या मंदिराच्या शेजारील आजोळ घरात विसावा घेणार असून 3 जुलै ते 19 जुलैपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आजोळ घरीच मुक्कामी राहणार आहेत. दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने निघतील. त्यानंतर 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी राहतील आणि 24 जुलै रोजी पौर्णिमेचा प्रसाद घेऊन शासकीय बसने परतीच्या प्रवासाला निघतील.

हेही वाचा -वैफल्यग्रस्त झाल्यानेच चंद्रकांत पाटलांकडून सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details