महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी'...वाचा काय म्हणाले संजय राऊत फडणवीसांना ? - शिवसेनेचा महापौर

'कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी..हे नाटक रंगमंचावर फार गाजलं आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

sanjay raut
sanjay raut

By

Published : Oct 13, 2021, 4:15 PM IST

पुणे - 'कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी..हे नाटक रंगमंचावर फार गाजलं आहे. तसे वाटत असल्यास अजूनही मी मुख्यमंत्री आहेच. आम्हाला ही वाटत दिल्लीत गेल्यावर मुख्यमंत्री व्हावे', असे वाटते म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटते असं वक्तव्य केले होते.

'लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी'
त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावत्यांची भावना ही योग्य भावना आहे. माणसाने स्वप्नांत रममाण व्हावं. चांगली स्वप्ने पहावीत. स्वप्नांमध्ये बळ असावे. त्यांच्या पंखांमध्ये ताकद असावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावे, असेही राऊत म्हणाले. भागवत यांना सावरकरांचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व वाटत असल्यास ही चांगली गोष्ट आहे. आम्ही संघाच्या या भूमिकेचे स्वागत करतो. पण, सावरकरांना भारतरत्न कधी देणार तेही एकदाचं जाहीर करून टाका. वीर सावरकर हे आमचे आदर्श आहे आणि राहतील, असेही राऊत यांनी सांगितलं.ठाकरे पवार हे राजकारणातील एक चलनी पॅटर्नराज्यात सध्या ठाकरे आणि पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. देशात आणि राज्यात खूप पॅटर्न झाले आहे. प्रत्येक वेळेला खूप पॅटनर्न येतात जातात. पण ठाकरे पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चलनी पॅटर्न असल्याचेही राऊत म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य केलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असेल.आतापर्यंत शिवसेनेचा महापौर झालेला नाही याची आम्हाला खंत आहे. पुढील निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहे, असेही राऊत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details