पुणे : संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती असून, ते रोज दिवसभर काहीतरी बोलत असतात. कारण त्यांना काही कामं नाहीत. मात्र आम्हाला कामं आहेत. ते मोकळे आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) यांना लगावला ( Devendra Fadnavis Criticized Sanjay Raut ) आहे.
२०२४ कोल्हापूरची ती जागा आम्हीच जिंकू :काल उत्तर कोल्हापूर मतदार संघाचा निकाल ( Kolhapur North By Election Result 2022 ) लागला आहे. यात भाजपचा पराभव झाला असून, त्यावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. आम्ही आम्हाला मिळलेल्या मतावर समाधानी असून, आम्ही एकटे लढलो. ते तिघे लढले तरी आम्हाला तेवढी मत मिळाली. 2024 ला आम्ही ही जागा नक्की जिंकू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.