महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजीनामा देऊन अजित पवार नवीन पक्ष काढू शकतात; संजय काकडेंचे वक्तव्य

अजित पवार राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे ते दुसरा पक्ष काढू शकतात, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काकडे यांनी अजित पवार यांच्या राजिनाम्यावर वक्तव्य केले आहे.

By

Published : Sep 28, 2019, 4:34 PM IST

पुणे - अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर जाणे हे शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही परवडणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केले आहे. तसेच अजित पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय एका दिवसात घेतलेला नाही. गेल्या काही काळापासून ते यासंदर्भात विचार करत असणार, असे काकडे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काकडे यांनी अजित पवार यांच्या राजिनाम्यावर वक्तव्य केले आहे.

अजित पवार यांच्या राजीनाम्याचे जे कारण शरद पवार देत आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचे मत काकडे यांनी यावेळी व्यक्त केले.

अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत असून, अचानकपणे ते राजकारणापासून दूर जातील असे वाटत नाही. त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी योजना असतील, असे संजय काकडे म्हणाले. मात्र, दादांचे जाणे राष्ट्रवादीला परवडणार नसून, विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे खूप मोठे नुकसान होईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !

अजित पवार राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे ते दुसरा पक्ष काढू शकतात, असे देखील संजय काकडे म्हणाले. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी ही अजित पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत, दादांच्या राजीनाम्यामागे पक्षाअंतर्गत नेतृत्वाचे वाद असू शकतात, असे मत मांडले आहे. तसेच कौटुंबीक वादावर बोलणार नसल्याची प्रतिक्रिया बापट यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details