महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएमपीचे प्रवासीही होणार निर्जंतुक, कर्मचाऱ्यांची संकल्पना - buses in pune

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनीही उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीतून बसमध्येच सॅनिटायझर यंत्रणा साकारली आहे.

sanitizer shower in PMP
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे.

By

Published : Apr 19, 2020, 4:18 PM IST

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनीही उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीतून बसमध्येच सॅनिटायझर यंत्रणा साकारली आहे. बसमध्ये ये-जा करणारा प्रत्येक प्रवासी या सॅनिटायझर फवारणीतून गेल्यानंतर निर्जंतुक होतील, याची दक्षता घेण्यात आली आहे. हे प्रायोगिक तत्वावर असून त्यात आवश्यकतेनुसार आणखी बदल करण्यात येणार असल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून ‘पीएमपी’कडून बससेवा सुरू आहे. दिवसभरात १०० हून अधिक मार्गांवर बसेस धावत आहेत. या गाड्या रात्री आगारामध्ये धुवून दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्गावर आणण्यात येतात. पण या बसमधून ये-जा करणारे प्रवासी देखील निर्जंतुक होण्यासाठी बसच्या दरवाज्यात सॅनिटायझरचा शॉवर बसवण्यात आला आहे. कात्रज व कोथरूड आगारातील कर्मचाऱ्यांनी केवळ पाचशे रुपयांच्या खर्चात ही यंत्रणा तयार केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details