पुणे - मालेगाव बाँम्बस्फोटाला 28 सप्टेंबरला अकरा वर्षे उलटल्यानंतरही या खटल्याचा अंतिम निकाल लागत नसल्याने, खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.
या खटल्यातील निष्पाप व निर्दोष लोकांना यातना भोगाव्या लागत असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मालेगाव बाँम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह यांना जामिनावर सोडण्यात आले. तसेच या खटल्याची सुनावणी दररोज घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याचे त्यांनी सांगितले.