महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Salons And Beauty Parlours Pune : सलूनप्रमाणे ब्युटी पार्लरही सुरु ठेवण्यास परवानगी द्या - सोमनाथ काशीद - सलून आणि ब्युटी पार्लर पुणे

ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात ब्युटीपार्लर व्यवसायिकांचे नुकसान होणार असून सरकारने सलून सारखे निर्णय ब्युटी पार्लरबाबतीतही घ्यावा, अशी मागणी सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी केली आहे.

सोमनाथ काशीद
सोमनाथ काशीद

By

Published : Jan 9, 2022, 3:21 PM IST

Updated : Jan 9, 2022, 3:37 PM IST

पुणे - राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता नवे निर्बंध लागू होत असल्याचे राज्य सरकारने जाहिर केले आहे. नव्या आज मध्यरात्रीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय सलून व्यवसाय हा 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात ब्युटीपार्लर व्यवसायिकांचे नुकसान होणार असून सरकारने सलून सारखे निर्णय ब्युटी पार्लरबाबतीतही घ्यावा, अशी मागणी सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देतांना सोमनाथ काशीद
  • 'सरकारने विचार करून निर्णयात बदल कराव'

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता मोठ्या प्रमाणात अनेक समस्या तसेच मोठ्या आर्थिक नुकसानाला आम्हाला सामोरे जाव लागले आहे. अशातच आत्ता या निर्णयाने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जाव लागणार आहे. शासनाने याचा विचार करून यात बदल करावे, अशी मागणी सोमनाथ काशीद यांनी केली आहे. तसेच याबाबत संघटनेच्यावतीने ऑनलाइन बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

  • काय आहे नियमावली?

जिम, स्पा पूर्णपणे बंद

नाट्यगृह सिनेमागृहात, सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती

रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत नाइट कर्फ्यू

मैदान, उद्याने आणि पर्याटनस्थळे बंद

थिएटर, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

स्वीमिंग पुल, स्पा पुर्णपणे बंद

शाळा, कॉलेज 15 फ्रेब्रुवारीपर्यंत बंद

हॉटेल आणि रेस्टॉरट 50 टक्के क्षमतेने 10 पर्यंत चालू राहणार

हेही वाचा -वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द ; पंतप्रधान कार्यालयाची माहिती

Last Updated : Jan 9, 2022, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details