पुणे -भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik ) यांच्यावर एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्विकार न करणे आणि त्या पीडित महिलेला त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल ( Case File Against BJP MLA Ganesh Naik ) करण्यात आला आहे. गणेश नाईक यांना आता याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कारवाई देखील लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ( State Women Commission Chairperson Rupali Chakankar ) यांनी दिली आहे.
काही दिवसापूर्वी पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज (रविवारी) गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना आता याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.