महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kiran Mane : किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगात धाव; चाकणकरांनी प्रॉडक्शन हाऊसला मागितले स्पष्टीकरण - रुपाली चाकणकर

अभिनेते किरण माने यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांना मालिकेतून काढणे हे प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. (Actor Kiran Mane controversy ) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Mulgi Jhali Ho) यांनी आता या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. (Complaint to Women Commission) किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली.

किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगात धाव; चाकणकरांनी प्रॉडक्शन हाऊसला मागितले स्पष्टीकरण
किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगात धाव; चाकणकरांनी प्रॉडक्शन हाऊसला मागितले स्पष्टीकरण

By

Published : Jan 18, 2022, 11:02 AM IST

पुणे - अभिनेते किरण माने यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांना मालिकेतून काढणे हे प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता (Actor Kiran Mane controversy) या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. (Rupali Chakankar, Chairperson of the Women Commission) किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून किरण माने यांना मालिकेतून का काढले? याचा जाब विचारला आहे. (Kiran Mane removed from the series) यामध्ये या कृत्याचे स्पष्टीकरण द्या, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रॉडक्शन हाऊसला पत्र

निर्मिती संस्थेने किरण माने यांना मालिकेतून का काढले याचे स्पष्टीकरण द्यावे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना घई यांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांच्या तक्रारीचा उल्लेख केला आहे. पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी आपल्याला या सगळ्या प्रकाराचा मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले आहे. सोबतच, आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. या सगळ्याची दखल घेत या निर्मिती संस्थेने किरण माने यांना मालिकेतून का काढले याचे स्पष्टीकरण द्यावे’, असे पत्र रुपाली चाकणकर यांनी लिहिल लिहल आहे.

लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश

कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत.

काय म्हणाले किरण माने?

एक पोस्टमुळे त्यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावर किरण माने यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत खुलासा केला की, "मी माझ्या कामात कोणतीही चुक नाही केली. मी वेळेवर शुटिंगला हजर रहायचो. कोणतंही गैरवर्तन माझ्याकडून सेटवर झालेलं नाही. नेहमीप्रमाणेच मी जीवतोडून माझ्या भुमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मला काम थांबविण्यासाठी सांगण्यात आलं. का तर माझ्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे काही ठराविक वर्गाची मनं दुखावली गेली आहेत.

हेही वाचा -Anil Deshmukh bail plea: अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामीनावर न्यायालय आज देणार निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details