पुणे - एसटी कामगारांच्या ( MSRTC Workers ) प्रश्नावर सर्वाधिक आवाज उठवणारे शरद पवार ( Sharad Pawar ) हेच आहेत. दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) निकाल दिला. त्यानंतर एसटी कामगारांनी जल्लोष केला, आनंदात भाषणेही केली. दुसऱ्या दिवशी अचानक अस काय झाली की शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावर कामगार आंदोलकांनी अशा प्रकारचा भ्याड हल्ला ( Silver Oak Attack ) केला. या भ्याड हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण, त्याला शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar on Silver Oak Attack ) यांनी केली आहे.
बंड गार्डन येथे घडलेली घटना निंदनीय असून त्याबाबत कारवाईच्या सूचना महिला आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत. त्यात शक्यतो जवळच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय समाज माध्यमांवर काही टाकत असताना काळजी घ्यावी, असही यावेळी चाकणकर म्हणाल्या.