पुणे -राज्यात सद्या अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही विकृत मनोवृत्ती आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar Criticized Navneet Rana ) यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा हे केंद्रात प्रतिनिधित्व करतात. जेंव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेंव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत का मागितली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
'वाद कसा निर्माण होईल याकडे लक्ष' -अपक्ष खासदार नवनीत राणा या राज्यतील ठाकरे सरकार विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे. यावर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, 'कोरोनाच्या महामारीतून आत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न,असे खूप मोठे प्रश्न राज्याच्या समोर आहे. यावर न बोलता, या राज्यता वाद कसा निर्माण होईल याकडे काहींचा लक्ष आहे.'