महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

होऊ दे चर्चा..! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' न लागलेल्या फलकाची जोरदार चर्चा - pune bjp news

मुख्यंमत्री देवेद्र फडणवीस यांचा फोटो असलेला फलक पिपंरी -चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर लावल्याचे व्हायरल झाले होते. मात्र, हा व्हायरल झालेला फोटो बनावट असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या न लागलेल्या त्या फलकाची जोरदार चर्चा

By

Published : Nov 7, 2019, 7:51 AM IST

पुणे - सेना आणि भाजपा या पक्ष्यात सत्तास्थापनेवरून मतभेद दिसत असून संजय राऊत हे भाजपावर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. अशातच संजय भाऊ आय एम सॉरी त्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले फलक पिंपरी-चिंचवड शहरात असल्याचे व्हायरल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, हे फलकच लावले नसल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या न लागलेल्या त्या फलकाची जोरदार चर्चा

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पॉट 18 येथे मुख्यमंत्र्यांचे फलक लागल्याचं सांगण्यात येत होते. मात्र, अस काही नसल्याचे समोर आले आहे. व्हायरल झालेले फोटो बनावट असून असा खोडसाळ पणा कोणी केला आहे, हे पाहावे लागेल. एका भाजप नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांबद्दल टिपण्णी करणारे फलक लावणाऱ्यावर पत्रकाद्वारे कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे वाकड पोलिसांचीदेखील धावपळ झाली. मात्र, अशा प्रकारचे फलक लावले नसल्याचे समोर आल्याने भाजप नगरसेवकाची गोची झाली आहे.

व्हायरल झालेले फलक, ठिकाण जुळत असलं तरी फोटोमधील बारकावे पाहिल्यानंतर त्यात अनेक त्रुटी आढळून येतात. तसेच तिथे विचारणा केली असता, गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी कोणताच फलक लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा खोडसाळ पणा मागे कोण आहे? याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. केवळ प्रकाश झोतात येण्यासाठी हे कृत्य केलं आहे, हे देखील पोलिसांना तपासावे लागणार आहे. सध्या तरी या या फलकाची जोरदार चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details