महाराष्ट्र

maharashtra

बौद्ध समाजाविषयी बच्चू कडू यांनी चुकीची माहिती पसरवू नये; आरपीआयचे आवाहन

बौद्ध वंदना करताना कधीही बौद्ध समाज लाऊडस्पीकर लावत नाही. बौद्ध धम्म हा शांतता मानतो. माणसा-माणसात भेद करत नाही. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल बौद्ध समाजाची माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

By

Published : Apr 20, 2022, 3:17 PM IST

Published : Apr 20, 2022, 3:17 PM IST

सचिन खरात
सचिन खरात

पुणे - बौद्ध समाजाच्या भावना दुखवून समाजाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याने मंत्री बच्चू कडू यांनी बौद्ध समाजाची माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी मंदिर, मस्जिद आणि बौद्ध विहार यावरील देखील भोंगे काढले पाहिजेत, अशी मागणी एका मुलाखती दरम्यान केली होती.

बौद्ध समाजाविषयी बच्चू कडू यांनी चुकीची माहिती पसरवू नये

बच्चू कडू चुकीची माहिती पसरवत आहेत - बौद्ध वंदना करताना कधीही बौद्ध समाज लाऊडस्पीकर लावत नाही. बौद्ध धम्म हा शांतता मानतो. माणसा-माणसात भेद करत नाही. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल बौद्ध समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच बच्चू कडू यांनी कोणत्या बौद्ध विहारावर भोंगा बघितला असा सवालही खरात यांनी केला. त्याचबरोबर राज्यात आपण मंत्री आहात. एखाद्या समाजाबद्दल अशी चुकीची माहिती पसरवू नका, अशी विनंती देखील आरपीआयने बच्चू कडू यांना केली आहे.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले होते -राज्यात सध्या जे राजकारण भोंग्यावरून सुरू आहे, त्यावर ट्विट करत भाष्य करताना मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनाने होरपळून निघाला. मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. त्यावेळी केवळ सेवा व रुग्णवाहिकेचा आवाज येत होता. यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवा, असे ते म्हणाले. भोंगे बंद करायचे असेल तर मंदिर, मशिद, बौद्ध विहारावर या सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद करावे. तसेच सर्वाप्रथम निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details