महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत यावे - आठवले - ramdas athwale on shivsena

भाजपा व रिपब्लिकन पार्टी एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे," असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(RPI)चे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athwale) यांनी केले.

By

Published : Jul 16, 2021, 4:45 PM IST

पुणे - "राज्याच्या महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेने(shivsena)ने पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजपा व रिपब्लिकन पार्टी एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे," असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(RPI)चे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athwale) यांनी केले. पुणे महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'पुणे पालिकेचे विभाजन करावे'

तो पुढे म्हणाले, "पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन. कोरोनाची परिस्थिती हाताळताना पुण्याचे महापौर, उपमहापौर व पालिका प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या प्रमाणात योजना आखल्या. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून दिले, रुग्णालय उभे केले. आता तिसरी लाट आली, तरी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. राज्यांना मदत गेली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर आपण मात करू शकतो." दरम्यान 'गो कोरोना गो' म्हणत होतो. मात्र, मलाच कोरोना झाल्याने मी आता 'नो कोरोना नो' म्हणतो, असे ते म्हणाले.

'चर्चेतून नाराजी दूर होईल'

"पंकजा मुंडे (pankaja munde) गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल व सर्वांना न्याय देता येईल. मराठा आरक्षण (maratha reservation) मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींची २५ टक्क्यांमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण मिळेल," असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

'भविष्यातही भाजपासोबतच'

"रिपब्लिकन पार्टीचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपासोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपाच्या साथीने चांगल्या जागा मिळतील," असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details