महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Robbery Gang Arrest : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 14 पिस्तूल जप्त - पिंपरी चिंचवड पोलीस दरोडा टोळी अटक

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला ( Robbery Gang Arrest In Pimpari Chinchwad ) पिंपरी-चिंचवड दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 14 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. या प्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune Robbery Gang Arrest
Pune Robbery Gang Arrest

By

Published : Jan 18, 2022, 8:30 PM IST

Updated : Jan 18, 2022, 9:45 PM IST

पुणे -दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला ( Robbery Gang Arrest In Pimpari Chinchwad ) पिंपरी-चिंचवड दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 14 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. या प्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका आरोपीकडून यापूर्वी देखील 24 पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती. आकाश अनिल मिसाळ, रुपेश सुरेश पाटील, ऋतिक दिलीप तापकीर, अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चार लाखाच्यावर मुद्देमाल जप्त -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पुणे रोडवरील वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, रात्री तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या फ्लॅटमधून सहा पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळाले. तर आकाश मिसाळ याच्या घरातून चार पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. आरोपी रुपेश पाटील याने भोसरी येथील अजित गुप्ता याला पिस्तूल विकले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सापळा लावून अजित गुप्ताला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी एकूण 14 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख 90 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार -

आरोपी रुपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रुपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रुपेश पाटील आणि टोळीकडून 24 पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर देखील तो सुधारला नाही. त्याने पुन्हा मध्यप्रदेशातून पिस्टल आणून शहरात विकण्याचा काळा बाजार चालू केला. यामुळे त्याला पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागली आहे. रुपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा -'शाहिस्तेखानाची बोटही महाराष्ट्रात छाटली गेली होती; त्यामुळे तुमचा..'; पटोलेंवर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली

Last Updated : Jan 18, 2022, 9:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details