पुणे सातारा महामार्गावरील Pune Satara Highway खेड शिवापूरच्या Khed Shivapur , श्री गणेश ज्वेलर्सवर तीन जणांनी सशस्त्र दरोडा Robbery at Shree Ganesh Jewellers टाकला आहे. ज्वेलर्ससह शेजारच्या सलून दुकानात गोळीबार करत सोने लुटून तिथून ते पसार झाले. खेड शिवापूर पोलिसांकडून तपास सुरू Investigation started by Khed Sivapur police करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरोड्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या शोधासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
पिस्तुल दाखवून लुटले सोनेपुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर या गावातील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स या दुकानावर तीन जणांनी सशस्त्र दरोडा टाकला, आणि त्यानंतर सोने लुटून तिथून पळ काढला, दरोडा टाकला त्याशेजारी असलेल्या सलून दुकानावर सुद्धा हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना समजताच राजगड पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी ,पंचनामा केला. शिवापूर वाडा येथे बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास, श्री गणेश ज्वेलर्स मध्ये तीन जण शिरले. त्यांनी त्यांच्याकडील पिस्तुल दाखवून ज्वेलर्स मधील दोन जणांना बाजू हटीये असे म्हणून काऊंटर वरील पाच सोन्याच्या डबे घेऊन शेजारी असलेल्या सलुनच्या दुकानात गोळीबार केला. त्यानंतर दुकानाच्या काचा हत्याराने फोडून दुचाकीवर पळून गेले.