महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Increase In Rickshaw Fare : पुण्यात रिक्षाची भाडेवाढ: ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांना बसणार

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त बैठकीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) , बारामती या तीन शहरांच्या रिक्षा प्रवासामागे 3 रुपये भाडे वाढ ( Rent increase ) करण्यात आली आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना अचानक रात्री सीएनजीचे भाव ( CNG price hike ) दोन रुपयांनी वाढवण्यात आले त्यामुळे पुण्यात रिक्षा चालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Rickshaw fare hike in Pune
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ

By

Published : Jul 26, 2022, 4:45 PM IST

पुणे :प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी संयुक्त बैठकीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती या तीन शहरांचे रिक्षा प्रवासामागे 3 रुपये भाडे वाढ करण्यात आली आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना अचानक रात्रीच सीएनजीचेही भाव दोन रुपये वाढवण्यात आले आहे. तर ही झालेली भाडेवाढ या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या अशीच आहे. असे बघतोय रिक्षावाला फोरम संघटनेने म्हटले आहे.

पुण्यात रिक्षाची भाडेवाढ: ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांना बसणार



अनुदानित सीएनजी द्यावा -पुणे शहरामध्ये जे रिक्षा व्यावसायिक आहेत झालेल्या भाडेवाढीवर समाधानी नाहीत. कारण एक ते दोन रुपयांनी भाव वाढ झालेली आहे. परंतु सीएनजीचे भाव 85 ते 87 रुपये झालेले आहेत. काल रात्री दोन रुपये भावे वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सीएनजीची भाववाढ जोपर्यंत स्थिर राहणार नाही तोपर्यंत
रिक्षचालकांना परवडणार नाही. जी भाववाढ झाली त्यात आम्ही समाधानी नाहीत असे रिक्षा व्यावसायिक यांनी सांगितले. सरकारने आम्हालां अनुदानित सीएनजी द्यावा.

रिक्षा प्रवासामागे 3 रुपये भाडे वाढ - गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंमध्ये सातत्याने होत असलेल्या ( Necessary goods became expensive ) वाढीमुळे नागरिक हैरान झाले आहे. त्यातच आत्ता येत्या 1 ऑगस्ट पासून रिक्षांच्या भाड्यांमध्ये ( Increase in rickshaw fare ) देखील वाढ होणार आहे. आत्ता पुणेकरांना 1 ऑगस्ट पासून प्रती दीड किलोमीटरसाठी 23 रुपये मोजावे लागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे ( Regional Transport Authority Pune ) यांची आज संयुक्त बैठकीत पार पडली. या बैठकीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती या तीन शहरांचे रिक्षा प्रवासामागे 3 रुपये भाडे वाढ करण्यात आली आहे.

आता २३ रुपये मोजावे लागणार -पाहिल्या प्रत्येक दीड किलोमीटरमागे सर्वसामान्य नागरिकांना २१ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता २३ रुपये मोजावे लागणार आहे. दीड किलोमीटरनंतर त्या पुढे प्रत्येक किलोमीटर मागे १४ रुपये मोजावे लागत होते. ते आता १५ रुपये नागरिकांना मोजावे लागणार आहे. वाढत्या महागाईचा काळात पेट्रोल-डिझेल बरोबरच सीएनजीच्या दरात चांगली वाढ ( CNG price hike ) झाली होती. 63 रुपयेच दर 85 रुपयांपर्यंत पोहचले होते. रिक्षा चालकांना या दरात प्रवाश्यांना सेवा देणे परवड नव्हते म्हणून रिक्षा चालकांनी भाडे वाढ करण्याची मागणी गेल्या काही काळापासून लावून धरली होती. आज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त बैठकीत 3 रुपयाने भाडे वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. या निमित्ताने रिक्षा चालकांमध्ये आनंदच वातावरण पहायला मिळत आहे. परंतु असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.

हेही वाचा :Increase In Rickshaw Fare : 1 ऑगस्टपासून रिक्षा प्रवास महागणार, मोजावे लागणार एवढे पैसे

ABOUT THE AUTHOR

...view details