पुणे - भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या कर्नलने पत्नीची गोळी झाडून हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना पुण्यात बुधवारी रात्री घडली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, कर्नलने पत्नीला ठार करुन स्वतः का आत्महत्या केली, याची माहिती मिळू शकली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Pune Crime : पुण्यात सेवानिवृत्त कर्नलची पत्नीची हत्या करत आत्महत्या - पुण्यात सेवानिवृत्त कर्नलची आत्महत्या
भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या कर्नलने पत्नीची गोळी झाडून हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना पुण्यात बुधवारी रात्री घडली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
![Pune Crime : पुण्यात सेवानिवृत्त कर्नलची पत्नीची हत्या करत आत्महत्या pune police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15074246-1007-15074246-1650518579022.jpg)
काय आहे प्रकरण - याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नलचे नाव नारायणसिंग बोरा आहे. ते 75 वर्षांचे होते. तर त्यांच्या पत्नीचे नाव चंपा बोरा असून त्या 63 वर्षांच्या होत्या. निवृत्त कर्नल बोरा आपल्या पत्नीसह पुण्यात राहत होते. त्यांना तीन मुले असून त्यांचा एक मुलगा लष्करात आहे. तर दुसरा मुलगा मुंबईत राहतो. तर त्यांची रक मुलगी दिल्लीत राहते.
पोलिसांकडून तपास सुरू - सदर घटना घडण्याआधी बोरा यांचा मुलगा त्यांना फोन करत होता. मात्र, बराच वेळ फोन करत असताना देखील आई आणि वडील दोघांनीही फोन उचलला नाही त्यामुळे मुलाला शंका आली आणि त्याने आपल्या मित्राला घरी पाठवले. मित्र आल्यानंतर त्यांच्या घराचे दार पूर्णपणे बंद होते. दार उघडत नसल्याने सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगण्यात आले. पण तरीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी ही सर्व बाब मुंढवा पोलिसांना कळवली. त्यानंतर मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर दोघेही मृतावस्थेत आढळली. या घटनेची पुढील चौकशी मुंढवा पोलीस करत आहेत.