महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bipin Rawat chopper crash : सीडीएस पद मोकळं ठेवण धोकादायक - ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन - ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन

ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन ( brigadier Hemant Mahajan ) यांनी पुण्यात बोलताना बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. बिपीन रावत यांच्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी लागणार आहे. हे पद मोकळं ठेवण धोकादायक असून जर हे शत्रू राष्ट्राचा घातपात असेल तर जशाच तसे उत्तर द्यावं लागेल, असे ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन यांनी म्हटलं.

Hemant Mahajan
हेमंत महाजन

By

Published : Dec 9, 2021, 9:36 AM IST

Updated : Dec 9, 2021, 12:14 PM IST

पुणे -माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत( Bipin Rawat passes away ) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. बिपीन रावत यांच्या मृत्यूवर ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन यांनी पुण्यात बोलताना बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. बिपीन रावत यांच्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी लागणार आहे. हे पद मोकळं ठेवण धोकादायक असून जर हे शत्रू राष्ट्राचा घातपात असेल तर जशाच तसे उत्तर द्यावं लागेल, असे ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन ( brigadier Hemant Mahajan ) यांनी म्हटलं.

ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन

ईशान्य भारतातील घुसखोरी असो किंवा पाकिस्तानविरोधात त्यांनी सर्वाच ठिकाणी चांगलं काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी सीडीएस म्हणून देखील चांगलं काम केलं होतं, असे महाजन म्हणाले. तसेच हवामानात बदल होतो किंवा एखादा पक्षी समोर आला की अशी घटना होण्याची शक्यता असते. मात्र, मला घातपाताची शक्यता वाटते, अशी शंका हेमंत महाजन यांनी उपस्थित केली.

या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमधून (Army Chopper Crash) बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

बिपीन रावत यांच्याबद्दल -

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958 मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एल एस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचे बालपण सैनिकांच्या सहवासातच गेले. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.

Last Updated : Dec 9, 2021, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details