पुणे -अभिनेता सलमान खान याच्या एका चित्रपटाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातले होते. तो चित्रपट म्हणजे बजरंगी भाईजान. या चित्रपटातील मुन्नी ही लहान वयातच भारतात येते आणि तेथून तिला पाकिस्तानात नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशीच एक मुन्नी आहे रिना वर्मा. मे 1947 मध्ये 15 वर्षांच्या रिना वर्मा ( Pune old lady will visit pakistan ) यांनी जातीय दंगलीच्या भीतीने पाकिस्तान येथील रावळपिंडीच्या प्रेम गल्लीतील आपले घर सोडले. त्यानंतर त्या ( Reena Verma will visit pakistan ) आणि त्यांची भावंडे हिमाचल प्रदेशातील सोलनला रवाना झाल्या. दंगलीची परिस्थिती शांत होताच ते घरी परततील अशी रीनाला खात्री होती. पण, तसे होऊ शकले नाही. आज 75 वर्षांनंतर रीना या त्यांच्या पाकिस्तानमधील घरी जाणार आहे.
हेही वाचा -Raj Thackeray Angry on Reporter : ...अन् राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, म्हणाले...
रावळपिंडी येथील घरापासून लांब असलेल्या रिना या 75 वर्षांनंतर पुन्हा पाकिस्तानला ( Old lady from Pune will visit home in Rawalpindi ) जाणार आहे. आता रिना वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे. त्वचेच्या सुरकुत्या लोंबकळत आहेत, पण पुन्हा घर पाहायला मिळेल या आनंदाने त्यांचा चेहरा उजळून निघाला आहे. रावळपिंडीचे घर पाहण्याची रिनाची इच्छा आता पूर्ण होणार आहे. फाळणीपूर्वीच्या भारतात त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या पैशाने जे घर बांधले ते त्यांना पाहायला मिळणार आहे. या घराच्या अनेक आठवणी आजही रिना यांना माहीत असून, ते त्या घराबाहेरील गल्ली आणि तेथील सर्वच माहिती सांगतात.
90 दिवसांचा मिळाला व्हिसा -गुडगाव येथे राहणारी रिना यांची मुलगी सोनाली हिने त्यांना गेल्या वर्षी व्हिसासाठी अर्ज करण्यास मदत केली. पण, अर्ज फेटाळण्यात आला. निराश न होता रिना यांनी पाकिस्तानी पत्रकाराच्या सांगण्यावरून एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हीना रब्बानी खार यांच्या निदर्शनास आला. नुकताच रिना आजींना 90 दिवसांचा व्हिसा देण्यात आला आहे. रावळपिंडीतील त्यांच्या घराला भेट देता येणार असल्याने रिना आजी खूप आनंदी आहेत. त्या एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हणतात की, आता आमच्या घरात कोण राहात आहे? हे मला माहीत नाही. पण, मला आशा आहे की ते मला ते घर पाहू देतील. रिना आजी जुलैमध्ये रावळपिंडीला जाण्याचा विचार करत आहेत. तिथे त्या फेसबुकच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व लोकांना भेटणार आहेत.
इथेही एका पत्रकाराने केली मदत -जसे बजरंगी भाईजान चित्रपटात मुन्नीला पाकिस्तानमध्ये पोहचवण्यासाठी एका पत्रकाराची मदत मिळाली, तसेच या मुन्नीला देखील पाकिस्तानमधील आपले घर पाहण्यासाठी एका पत्रकाराची मदत मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा त्यांनी आपल्या घराच्या बालपणीच्या आठवणी आणि ते पाहण्याची इच्छा फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली. पुण्याच्या या आजींच्या कथेने रावळपिंडीतील सज्जाद यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी रिना आजींचे घर शोधून काढले आणि घराचे फोटो आणि व्हिडिओही पाठवले. तो व्हिडिओ पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हीना रब्बानी खार यांच्या निदर्शनास आला आणि मग रिना आजी यांना 90 दिवसांचा व्हिसा मिळाला.
हेही वाचा -Panpoi birthday : पुण्यात नागरिकांनी साजरा केला पाणपोईचा वाढदिवस, 25 वर्षांपासून भागवत आहे तहान