पुणे- शहर व जिल्ह्यात शनिवारपासून मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा विळखा बसत चालला असताना हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी पुणे शहरात आणि जिल्ह्यात एका दिवसात नवे रुग्ण सापडण्याचा उच्चांक गाठला गेला आहे.
पुणे शहरात 4 एप्रिलला दिवसभरात तब्बल नवीन 6 हजार 225 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज 52 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या 901 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज घडीला पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 हजार 950 इतकी आहे. आज 17 हजार 774 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.