पुणे - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत ( Rebel Shivsena Mlas ) जाऊन सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले असून, उद्या ( 3 जुलै ) विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. विधानसभेत ( Floor Test ) गेल्यानंतर हे सगळे विचारवंत काय करणार त्याच्यावर अवलंबून आहे. पण, गेलेले आमदार सभागृहात बसल्यानंतर त्यांच मतपरिवर्तन होईल, असा विश्वास काही लोकांना आहे. मला असा विश्वास नाही, असे शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार म्हणाले की, बंडखोर आमदारांशी माझा संपर्क नााही आहे. माझा संबंध सेनेच्या नेत्यांशी असेल आमदारांशी नाही. त्यामुळे ते आमदार उद्या नक्की काय करणार हे माहीत नाही. तसेच, अध्यक्षपदाची निवडणूक कोणाच्या अध्यक्षेतेखाली होईल याबाबत पवार यांनी म्हटलं, आता तर झिरवळ हे आहे. पण, सभागृहाने काही निर्णय घेतला तर तो निर्णय अंतिम आहे. न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं पद गेलेलं आहे.
"नुपूर शर्मा प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे" - नुपूर शर्मा बाबात न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यासंदर्भात पवारांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाने वक्तव्य गंभीर स्वरुपाचे आहे. केंद्र राज्य आणि गृह खात्याने याबाबत काय करावं काय पाऊल उचलावी यात स्पष्ट सांगितलं आहे. याचा गांभीर्याने विचार सर्वांनी केला पाहिजे.