पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. पिढ्यानं पिढ्या झालेल्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं, या भागवतांच्या विधानाचा ब्राह्मण महासंघानं निषेध केला आहे. यासंदर्भात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील संघाच्या कार्यालयात निवेदन Union Office Notice दिलं आहे. मागच्या पाच- पन्नास वर्षांपूर्वी गुलामगिरी होती. लोकांना विकलं जात होतं, पण त्यावर आता असं कोणी म्हणत नाही.
ब्राह्मण समाजात मतभेद निर्माण करायचे पापक्षालन करावं. मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा कोणी म्हणत नाही. त्याबद्दल पापक्षालन करावं. त्यामुळं पाच- सातशे हजार वर्ष आधीची एखादी घटना उकरुन काढून हिंदू समाजात मतभेद निर्माण करायचे. ब्राह्मण समाजात मतभेद निर्माण करायचे. ब्राह्मण समाजाला वेगळं पाडायचं, हा उद्देश भागवतांकडून झालेला आहे. अशी आमची ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासंघ म्हणून ठाम भूमिका आहे, अस यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितल आहे.