महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे: पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन

अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना गेली वर्षभर टाळेबंदीने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली नाही तर, तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिला आहे.

Rashtrawadi Yuvati Congress
राष्ट्रवादी युवती काँग्रेस

By

Published : Mar 10, 2021, 7:24 PM IST

पुणे - दररोज वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.



पेट्रोल डिझेलचे दर शतकी वाटचाल करत असताना केंद्र सरकार सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ करत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना गेली वर्षभर टाळेबंदीने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली नाही तर, तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिला आहे.

हेही वाचा-सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँचमधून बदली; विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ

तर तुमची पाठ थोपटते - सक्षणा सलगर

मोदींना पंतप्रधान होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेली स्वप्नेच राहिली आहेत. युपीएच्या काळात स्मृती इराणी या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना गॅसचे दरवाढीवरू बांगड्या पाठवत होते. त्यांच्या बांगड्या संपल्या असतील तर युवती कॉंग्रेसच्यावतीने आम्ही बांगड्या पाठवू, असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे. तेच बांगड्या त्यांनी मोदींना पाठवा. तरच तुमची पाठ थोपटेल असा टोलाही यावेळी त्यांनी इराणी यांनी लगाविला आहे.

हेही वाचा-युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर

सरकारकडून जनतेला आधार देण्याऐवजी महागाईचा फटका-

मागील वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलचे भाव 78 रुपयांच्या जवळपास होते. कोरोना काळात सर्वच व्यवहार बंद होते. वाहतूकही ठप्प होती. या काळातही मोदी सरकारने अबकारी कर मोठ्या प्रमाणात वाढविला. या वाढीव कराची झळ आता सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आधी पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे दुजाभाव

राज्यात फडणवीस सरकार नसल्यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकार बरोबर दुजाभाव केला जात आहे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीचे पैसे येणे आहे. ते जर दिले तर निश्चितपणे महाराष्ट्र सरकार या धोरणात काही बदल करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details