मुंबई -अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे खूप चर्चेत आला आहे. अमेरिकेतील पेपर या इंग्रजी मासिकासाठी रणवीरने हे न्यूड फोटोशूट केले आहे. त्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर सर्वत्र रणवीरवर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, रणवीर विरुद्ध महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे. वकिल आशिष राय यांनी ही तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली आहे.
काय आहे तक्रारीत? -बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची तक्रार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. आशिष राय यांनी सांगितले की, नग्न फोटोशूट अभिनेता रणवीर सिंगने केले होते आणि ते सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून प्रसारित झाले होते. त्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्यात अभिनेता रणवीर सिंगविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ट्विटर अकाउंटवरून डिलीट करावा अशीही मागणी - सोशल मीडियाच्या ट्विटर अकाऊंटवरून ज्याप्रकारे हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. ते नक्कीच महिला आणि लहान मुलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेता रणवीर सिंगला आयोगाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, हा वादग्रस्त फोटो सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून डिलीट करावा अशीही मागणीही केली आहे. तसेच, महिला आयोगाकडे स्वत:हून दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.