पुणे -कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह साथीदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खंडणी गुन्हा दाखल केला आहे. फूड मॉल येथून वडापाव, सँडविच यासारख्या खाद्यपदार्थासह पाण्याच्या बॉटल्स मारहाण करून घेऊन गेल्या प्रकरणी दरोडाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
गजानन मारणे याच्यावर खंडणीची गुन्हा दाखल; मोक्का अंतर्गत कारवाई लकवरच पैसे न देता उर्से टोल नाका येथून प्रवास -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर स्वागत करत दहशत पसरविण्यात आली होती. दरम्यान, उर्से टोल नाका येथे मारणे आणि त्याच्या साथीदार टोल न भरता निघून गेले असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले असून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडापाव, सँडविच आणि पाण्याच्या बाटल्यांचे पैसे न दिल्याने दरोड्याचा गुन्हा -
फूड मॉल येथे गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांनी दमदाटी करून वडापाव, सँडविच या खाद्यपदार्थासह पाण्याच्या बाटल्या पैसे न देता घेऊन गेल्या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. आत्तापर्यंत 14 महागड्या गाड्यासह 36 जणांना अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आलेले आहे. मारणे याच्यावर लवकरच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा सूचक इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.