पुणे -अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी अयोध्या आणि पुणे ही दोन शहरे खास रेल्वेने जोडण्यात येणार आहे. त्यासाठीपुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल रेल्वे ( Rampath Yatra special train ) सुरू करण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State in the Ministry of Railways flagged new rail ) यांच्या हस्ते ऑनलाईन हिरवा कंदील दाखवून ही रेल्वे रवाना झाली आहे.
पुणे रेल्वे स्टेशन येथून निघालेली रामपथ स्पेशल रेल्वे ( Rampath Yatra special train from Pune ) रेल्वे 28 तारखेला 5 वाजता अयोध्येला पोहोचणार आहे. रामपथ स्पेशल रेल्वे ही पुणे-नाशिक-जळगाव -भुसावळ -खांडवा -इटारसी -माणिकपूर -बनारस व अयोध्या अशा मार्गाने ( Rampath special train route ) ही रेल्वे जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रामपथ यात्रा ट्रेन ही रामायण सर्किटचा भाग आहे. प्रभू रामाच्या प्रवासातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडते. रामपथ यात्रा पॅकेजमध्ये भाविकांसाठी तिकीट, निवास, भोजन, वाहतूक, पर्यटक मार्गदर्शक इत्यादी सर्व व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासनाचे विशेषत: आयआरसीटीसीचे अभिनंदन केले. लोकांनी हा दौरा करावा आणि त्यांचे अनुभव व्यापकपणे शेअर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे पंतप्रधानांचे ‘देखो अपना देश’ मोहीम आणि रामायण सर्किट यशस्वी होईल, असे यावेळी राज्यमंत्री ( Raosaheb Danve on Rampath Yatra special train ) रावसाहेब दानवे म्हणाले.
हेही वाचा-Burning Train In Morena : उधमपूर एक्सप्रेसच्या 4 डब्यांना लागली आग
मुख्य वैशिष्ट्ये-
रामपथ यात्रा ही तीर्थक्षेत्र विशेष पर्यटक ट्रेन ही अयोध्या, नंदीग्राम, वाराणसी, प्रयाग, शृंगावेरपूर आणि चित्रकूट यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश करणारी सर्व-समावेशक टूर पॅकेज आहे. या तीर्थक्षेत्र विशेष पर्यटक ट्रेनचे ( Rampath Yatra special train booking service ) बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तसेच आयआरसीटीसीच्या विभागीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये आणि पर्यटक सुविधा केंद्रांवर ऑनलाइन केले जाते.
हेही वाचा-Unique Marriage : एकाच मंडपात सहा सख्ख्या बहिणींनी घेतले एकत्र फेरे, काढली घोड्यावरून वरात